नगरपालिका,महापालिका व नगरपंचायत नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी नव्याने खर्च मर्यादा, खर्च किती करता येणार?
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे. या नव्या निर्णयानुसार नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवार प्रत्येकी किती खर्च करू शकतील याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बदलत्या काका नुसार आधीच्या खर्चाच्या तुलनेत सुमारे दीडपट वाढ करण्यात आली आहे. ही वाढ महापालिका व नगरपालिका यांच्या वर्गवारी नुसार ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये पूर्वी सदस्यसंख्येच्या आधारे खर्च मर्यादा ठरवली जात होती.
तेव्हा जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारांसाठी सहा लाख रुपयांची आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाख रुपयांची खर्च मर्यादा होती.
आता या नव्या निर्णयानुसार महापालिका नगरसेवकांसाठी व नगरपालिका नगरसेवक पदासाठी निवडणूक खर्च मर्यादा पुढील प्रमाणे लागू राहील.
मुंबई, पुणे आणि नागपूर महापालिका: ₹ १५ लाख
पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ठाणे महापालिका: ₹१३ लाख
कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई-विरार: ₹११ लाख
‘ड’ वर्गातील १९ महापालिका: ₹ ९ लाख
नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीही नव्या खर्च मर्यादा पुढील प्रमाणे
‘अ’ वर्ग नगरपरिषद: नगरसेवक ₹ ५ लाख, थेट नगराध्यक्ष ₹१५ लाख
‘ब’ वर्ग नगरपरिषद: नगरसेवक ₹ ३.५ लाख, नगराध्यक्ष ₹ ११.२५ लाख
‘क’ वर्ग नगरपरिषद: नगरसेवक ₹ २.५ लाख, नगराध्यक्ष ₹ ७.५ लाख
नगरपंचायत: नगरसेवक ₹ २.२५ लाख, नगराध्यक्ष ₹ ६ लाख
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
