भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

एक लाखांची लाच ; महिला वनपाल व दोघावर गुन्हा दाखल

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | लाकुड वाहतुकदाराकडून सुरुवातीला अडीच लाख रुपयांची व तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागणी केल्या प्रकरणी वनपाल महिला श्रीमती वैशाली गायकवाड , श्रीकृष्ण सॉ मिल चे मालक सुनिल धोबी (खासगी इसम ) आणी एक अनोळखी वन कर्मचारी अशा तिघांविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराच्या भावाने शेतातील निंबाची झाडे तोडली होती. तोडलेली झाडे तो मालेगाव येथे ट्रकने वाहून नेत होता. पारोळा परिसरातील एका फटाके कारखान्याजवळ वनपाल श्रीमती वैशाली गायकवाड व दोघांनी तो ट्रक पकडला. पकडलेला ट्रक त्यांनी श्रीकृष्ण सॉ मिल येथे लावला. पकडलेला ट्रक सोडवण्यासाठी २,५०,००० रुपयांची मागणी केली . तडजोडीअंती एक लाख रुपयांची मागणी तिघांनी केली.

तक्रारदारासह त्याच्या भावाने पकडलेला ट्रक सोडवण्यासाठी वारंवार विनंती केली. मात्र ट्रक सोडवण्यासाठी तिघांनी २,५०,००० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपयांची मागणी तिघांनी रेटून नेली. लाचेच्या मागणीची रक्कम वैशाली गायकवाड व वनविभागाच्या कर्मचा-याने सुनिल धोबी यांच्याकडे जमा करण्यास सांगितले. अखेर तक्रारदाराने जळगाव एसीबी विभागाकडे तक्रार केली. ती तक्रार तपासात निष्पन्न झाली.

त्या नुसार १)श्रीमती वैशाली गायकवाड, पदः वनपाल (वर्ग ४) नेमणुक वन विभाग, कार्यालय पारोळा, २) खाजगी इसम श्रीकृष्ण सॉ मिल पारोळा चे मालक श्री सुनिल धोबी ३) एक वन विभागाचा कर्मचारी, नेमणुक वन विभाग, कार्यालय पारोळा यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिस निरीक्षक नेहा सुर्यवंशी, पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक राकेश दुसाने, बाळु मराठे तसेच नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे हेकॉ विनोद चौधरी, चालक हे कॉ परशुराम जाधव, नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे हेकॉ नरेंद्र पाटील, पोना सुभाष पावरा आदींनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!