भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ मार्गे पुण्याला जाण्यासाठी रविवार पासून नवीन ट्रेन धावणार

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ जळगाव मार्गे पुण्याला जाण्यासाठी काही मोजक्या गाड्या धावत असून यातही कन्फॉर्म शीट मिळणे कठीण होते. अशातच रेल्वे भुसावळमार्गे पुण्यासाठी नवीन ट्रेन सुरु करण्यात आली आहे. ३ ऑगस्ट रविवार पासून रिवा – पुणे दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.या नव्या एक्सप्रेसचा भुसावळकरांना फायदा होणार आहे. मात्र या गाडीला जळगाव स्थानकांवर थांबा नाही.

भारतीय रेल्वे नवीन पुणे -रिवा -पुणे एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. या दोन शहरांना जोडणारी ही (कनेक्टिव्हिटी) पहिली ट्रेन असेल. ही ट्रेन आरक्षित आणि अनारक्षित प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात येत आहे.

या ट्रेनला येथे असणार थांबा!
या ट्रेनला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतना. थांबा असणार आहे.

कसे असणार पुणे-रिवा ट्रेनचे वेळापत्रक?
ट्रेन क्र. २०१५१ पुणे–रिवा एक्सप्रेस दर गुरुवारी १५.१५ वाजता पुणे स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता रिवा स्थानकावर पोहोचेल. तर ही ट्रेन रात्री २२.४० वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचले.
ट्रेन क्र. २०१५२ रिवा–पुणे एक्सप्रेस दर बुधवारी ०६.४५ वाजता रिवा स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.४५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. तर रात्री १२ वाजून ४० मिनिटाने भुसावळला पोहोचले.

आता जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे . यातच आता पुणे -रिवा -पुणे एक्स्प्रेस सुरु होणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र ही ट्रेन भुसावळ येथे थांबणार आहे. जळगाव येथे थांबणार नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!