भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

जिवंत काडतूसांसह गावठी बनावटीचे दोन पिस्तूल जप्त, दोन आरोपींना अटक,यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | देशी बनावटीचे पिस्तूल (अग्निशस्त्र ) व दोन जिवंत राऊंड यांचे सह दोघांना यावल पोलिसांनी अटक केली. यावल येथील बोरावल गेट परिसरातील युवराज उर्फ युवा राजु भास्कर वय ३४, तसेच भूषण कैलास सपकाळे वय ३१ रा.वराडसिम तालुका भुसावल येथील डॉ. आंबेडकरनगर या दोघांना
अवैध देशी बनावटीचे पिस्तूल (अग्निशस्त्र ) व दोन जिवंत राऊंड, विक्रीच्या उद्देशाने आणले असताना अटक करण्यात आली. युवराज उर्फ युवा राजीव भास्कर, व भूषण सपकाळे याचे अंग झडतीत देशी बनावटीचा गावठी पिस्तोल व २ जिवंत काडतुस,२ मोबाईल हँडसेट असा एकूण अंदाजे ६६ हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.यावल पोलिसांनी या दोघांना अटक करून आज यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.२८ पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.

सदर पिस्टल व जिवंत काडतुस ताब्यात घेवून युवराज भास्कर यास पंचासमक्ष सदर पिस्टल बाबत विचारपुस केली असता त्याने सदर पिस्टल ही भुषण कैलास सपकाळे यास विक्री करण्यासाठी ठरल्याप्रमाणे आणलेली होती असे सांगीतले तसेच भुषण कैलास सपकाळे यास पंचासमक्ष विचारपुस केली असता तो सदर पिस्टल ही युवराज भास्कर याचेकडून विकत घेण्यासाठी आलेला होता,सदर पिस्टल व काडतुसचेचे बदल्यात तो युवराज भास्कर यास २६ हजार रुपये नंतर आणुन देणार होता असे पंचासमक्ष सांगीतले.

सदर पिस्टलबाबत युवराज ऊर्फ युवा राजु भास्कर याचेकडे अधिकृत परवाना आहे अगर कसे याबाबत पंचासमक्ष विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे पंचासमक्ष सांगीतले.पोउनि सोपान गोरे यांनी पंचासमक्ष युवराज भास्कर यास विचारणा केली की तुझ्याकडे ३ देशी बनावटीचे पिस्टल व ६ जिवंत काडतुस असल्याची गोपनीय
माहीती आमच्याकडे आहे,सदर पिस्टल व काडतुस कोठे आहे असे विचारले असता त्याने पंचासमक्ष सांगीतले की दि.१८ सप्टेंबर २०२५ रोजी मी यावल शहरातील यावल भुसावळ रोडवरील भुसावळ नाका जवळील बियर शॉपजवळ माझेbओळखीचा समाधान बळीराम निकम रा.पाचोरा याचेकडून ३ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतुस विकतबीघेतले होते. त्यापैकी मी २ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ४ जिवंत काडतुस शुक्रवारी दि.१९ सप्टेंबर २०२५ रोजी अमळनेर येथील माझे ओळखीचा अनिल मोहन चंडाले यास अंमळनेर येथे जावून रुपये ४० हजार रुपयाला विक्री केले आहे अशी हकीकत सागीतली.

बुधवार दि.२४ रोजी २३:५० वाजेच्या सुमारास यावल शहराजवळ यावल ते चोपड़ा जाणारे हायवेवर दहीगाव फाटा येथे युवराज ऊर्फ युवा राजु भास्कर वय ३४ वर्षे रा.बोरावल गेट यावल डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ यावल त्याचे जवळ अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र)  व २ जिवंत राउंड हे त्याचे ओळखीचा भुषण कैलास सपकाळे वय ३१ वर्षे रा. वराडसिम,डॉ.आंबेडकरनगर ता. भुसावळ यास अनधिकृतपणे विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आलेला आहे. या कारणावरून दोघं आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून आरोपींना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.२८ पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याच्या आदेश देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!