भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

निंभोरा पोलिसांची कारवाई, २४ तासात जनरेटर चोर गजाआड

निंभोरा बुद्रुक ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज |रावेर तालुक्यातील वडगाव येथील शेती शिवारातील ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे किर्लोस्कर कंपनीचे मॉडेल क्रमांक kj 1 -20 ws 1/ 20 केवी डिझेल जनरेटर दिनांक 9 /1/2026 ते 10/1/ 2026 सकाळी दहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटाने पावर ग्रीड कंपनीच्या उभारलेल्या टावर जवळील जनरेटर चोरून लंपास केले असल्याची खबर शुभम मनोज कुमार चौधरी राहणार नासिक यांनी निंभोरा पोलीस ठाण्याला दिली.

फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल डी बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, दिपाली पाटील, ममता तडवी, हे का अविनाश पाटील, कॉन्स्टेबल किरण जाधव, परेश सोनवणे,सुभाष शिंदे, भूषण सपकाळे,चालक सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फिरून पावर ग्रिड कंपनी चे वडगाव शिवारात टावर जवळील काम करणारा शिपाई आरोपी आकाश मनोहर पाटील राहणार वडगाव याची अधिक चौकशी करून त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी २४ तासात तपास करून जनरेट चोर आकाश पाटील हाच असल्याचे निष्पन्न झाल्याने आकाश पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास अटक केली व त्याने दुसऱ्याला दिलेले जनरेटर हस्तगत केले.पुढील तपास सपोनि मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ढाकणे,दिपाली पाटील,ममता तडवी,हे का अविनाश पाटील व पोलीस तपास करीत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!