भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सर्व क्षेत्रात पत्रकाराची भूमिका महत्वाची :- सपोनी मिरा देशमुख

निंभोरा, ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज | सर्व क्षेत्रात तसेच जातीय सलोखा व शांतता राखण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची असते असे प्रतिपादन निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील पोलिस ठाण्यात पत्रकार सन्मान सोहळ्याच्या निमित्त पत्रकारांच्या सत्कार समारंभ वेळी निंभोरा पोलिस ठाण्याच्या सपोनी मिरा देशमुख यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे होते. प्रास्ताविक सूत्र संचालन गोपनीय पोलिस अमोल वाघ, यांनी केले.या वेळी सर्व प्रकारांचा सन्मान भेट वस्तू पुष्पगुच्छ देऊन सपोनी देशमुख यांनी केले.

या वेळी सपोनी देशमुख ,राजीव बोरसे, प्रवीण धुंदले, इकबाल पिंजारी, कांतीलाल गाढे, ध्यानेश्वर महाजन, दस्तगीर खाटीक, विनायक जहूरे, छगन पाटील, इद्रीस शेख, गोकुळ भोई यांनी मनोगत व्यक्त केले.या वेळी सुमित पाटील, सरदार पिंजारी, रमेश अवसरमल, संजय पाटील, प्रभाकर महाजन, भिमराव कोचुरे, राहुल जैन, जमील शेख, अनिल मानकरे,विनोद कोळी, मुनाफ शेख,उमेश तायडे,राजेंद्र गुरव, प्रेमानंद शेलोडे, तसेच पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अभय ढाकणे, दीपाली पाटील,ममता तडवी तसेच पोलिस स्टाफ यांच्या सह आदी पत्रकार बांधव उपस्थितीत होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!