रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल, तालुक्यात खळबळ
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील व उप सभापती योगेश पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास दाखल करण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे १२ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यामुळे राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आज रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सभापती सचिन पाटील व उप सभापती योगेश पाटील यांचेवर अविश्वास ठराव करण्यात केला असून सभापती व उपसभापती हे संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचे सांगितले जात असले तरी या मागे वेगळेच कारण असल्याची माहिती मिळत आहे. या मुळे रावेर तालुक्यासह जिल्ह्यात सहकार क्षेत्रात व जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे

