भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात ओळखपत्र लावणे बंधनकारक : अन्यथा….

मुंबई, मंडे टु मंडे न्युज |महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात असताना कार्यालयीन ओळखपत्र छातीवर लावणे बंधनकारक असल्याचे आदेश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने १० सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे हे निर्देश देण्यात आले.अनेक वेळा सूचना दिल्यानंतरही काही अधिकारी व कर्मचारी ओळखपत्र न लावता कार्यालयीन कामकाज करत असल्याचे निदर्शनास आले आहेत.

शासनाने यापूर्वी शासनाने शासन निर्णय ६/२/१९८०,७/५/२०१४ आणि १०/१०/२०२३  मध्येही अशा सूचना दिल्या होत्या. मात्र काही अधिकारी व कर्मचारी यांनी त्या सूचनांचे पालन न केल्याचे आढळून आले. त्यामुळे शासनाने आता या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.या निर्णयाने अधिकारी व बाहेरील व्यक्ती ओळखता येईल.

शासन परिपत्रकानुसार – ओळखपत्र न लावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शासनाच्या मते, कार्यालयीन ओळखपत्र लावल्यामुळे शिस्त, पारदर्शकता व जबाबदारी निश्चित होईल. तसेच नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांची सहज ओळख पटेल. हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यावर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!