धर्मनाथ बीज निमित्त सामूहिक पारायण चिनावल येथे भाविकांची अलोट गर्दी
चिनावल, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील चिनावल येथील जागृत श्री क्षेत्र नवनाथ मंदिरात नवनाथ बीज निमित्त श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांतर्फे एकदिवसीय सामूहिक पारायणाचे भव्य आयोजन करण्यात आले. या एक दिवसीय पारायणाचा लाभ घेण्यासाठी जळगाव, बुलढाणा, वर्धा, नाशिक, मलकापूर, नागपूर मुंबई-पुणे, तसेच राज्यभरातून अनेक भाविक आलेले होते.
पारायणाचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. भाविकांना श्री स्वामी समर्थ व नवनाथ पारायण केल्यामुळे येणाऱ्या दैवी अनुभूतीमुळे दरवर्षी गर्दीत वाढ होत आहे. यंदाही हजारो सेवेकर्यांनी पारायण केले तर शेकडो चिनावलकरांनी सेवा दिली. नवनाथ मंदिराच्या पटांगणात एक पारायण सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालले. या परायणासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नवनाथ ग्रंथ, पेढे, पाण्याची बाटली व इतर साहित्य स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आलेले होते. यावेळी भक्तगणांनी ठेवलेले नारळ येथील दैवी शक्तीमुळे आपोआप फुटून आल्याचे दिसले. उपस्थित भाविकांना सकाळी साबुदाणा खिचडी,चहा तसेच संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिनावल येथील ग्रामस्थांनी उत्कृष्ट असे नियोजन केले.
