बांगलादेशी आणि रोहिंग्याना घुसवण्याचं षडयंत्र, पारोळ्यात अस्तित्वात नसलेल्या उजाड गावच्या नावावर हजारो बोगस जन्माच्या नोंदी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावच्या नावावर ४ हजार ९०७ बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्या, रोहिंग्याना व बांगलादेशीना भारतात घुसविण्याच षडयंत्र असल्याचं सांगितलं जात असून याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली.
याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहार येथील अजयकुमार दुबे याला अटक केली, आणखी ५ आरोपींची नावे यात निष्पन्न झाल्याची पोलिसांची माहिती समोर आलीय.
बांगलादेशी आणि रोहिंगयांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर या प्रकरणात बोगस जन्माच्या नोंदी या रद्द करण्याचं काम सुरू असून दररोज १०० नोंदी रद्द केला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी दिली आहे
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात, भाटपुरी या उजाड पडलेल्या गावाच्या नावे जवळपास ५००० (चार हजार नऊशे सात) बोगस जन्म नोंदी (Fake Birth Certificates) झाल्याचे उघडकीस आले आहे, ज्यात काही व्यक्तींच्या संशयास्पद आणि बनावट नोंदी केल्या गेल्याचे आढळले, ज्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
भाजपने या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे आणि याबाबत किरीट सोमय्या यांनी जळगाव दौरा केला होता. Instagram यावर आधारित व्हिडिओमध्ये, एका व्यक्तीने याबद्दल माहिती दिली आहे की, भाटपुरी हे गाव उजाड असतानाही तिथे मोठ्या प्रमाणात बनावट नोंदी आढळल्याने चौकशी सुरू झाली.
