भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना ‘आदिशक्ती मुक्ताई’ सूतगिरणी येथे विनम्र अभिवादन

मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | सहकार आणि समाजकारणाच्या पटलावर आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि ‘आदिशक्ती मुक्ताई’ सूतगिरणीचे माजी अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मुक्ताई सहकारी सूतगिरणी, चांगदेव येथे ‘अभिवादन सभे’चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी स्व. निखिलभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांना गहिवरून आले होते.

यावेळी बोलताना माजी सभापती निवृत्ती पाटील म्हणाले की, “स्व. निखिलभाऊ आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी आणि कार्य आपल्यासोबत चिरंतन आहे. परिसरातील युवक आणि महिलांना हक्काचा रोजगार मिळावा, हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठीच त्यांनी सूतगिरणीच्या रखडलेल्या कामाला मोठी गती दिली होती. दुर्दैवाने काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले, मात्र रोहिणीताई खडसे यांनी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेऊन निखिलभाऊंचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केले आहे.”


ते पुढे म्हणाले की, “सर्वांत मिसळून राहणारा आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता आपल्यातून जाणे, ही मोठी हानी आहे. मात्र, आज शेकडो युवक आणि महिलांना या सूतगिरणीच्या माध्यमातून मिळालेला रोजगार हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.”

या अभिवादन सभेला श्री. निवृतीभाऊ पाटील, श्री.राजेंद्र माळी, श्री. रामदास पाटील, श्री. कैलास माळी, श्री. विलास धायडे, श्री. ईश्वर रहाणे, श्री. रामभाऊ पाटील, श्री. संदीप देशमुख, श्री. किशोर गायकवाड, श्री. विकास पाटील, श्री. सुरेश धनगर, श्री. प्रवीण पाटील, श्री. ललित महाजन, श्री. हरिश्चंद्र ससाने, श्री. लक्ष्मण सापधरे, श्री. पंकज सरोदे, श्री. संजय कपले, श्री. राजेंद्र पाटील, श्री. अजयसिंग पाटील, श्री. प्रदीप बडगुजर, श्री. मनोज तळले, श्री. संदीप जमळे, श्री. राजेंद्र पाटील, श्री. प्रशांत भालशंकर, श्री. विनोद कांडेलकर, श्री. दीपक साळुंखे, समस्त सूतगिरणी कर्मचारी मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. निखिलभाऊंच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी निखिलभाऊंच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या समाजकारणाच्या वाटेवर चालण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!