भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

प्रेम प्रकरणातून तरुणाची चाकूने भोसकून निर्दयी हत्या

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरातील मायटी ब्रदर्स दुकानासमोर, गोलाणी मार्केट परिसरात प्रेमप्रकरणाच्या संशयावरून १८ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटजवळील मायटी ब्रदर्स दुकानासमोर जय उर्फ साई गणेश गोराडे (वय १८, रा. काशीबाई शाळेमागे, दशरथनगर, जळगाव) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.मयताचे काका दिपक सोनू गोराडे (पाटील) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझा पुतण्या मयत जय उर्फ साईच्या वर्गात शिकणारी एका मुलीसोबत प्रेम प्रकरण आहे. या कारणाच्या संशयावरून आरोपी शुभम सोनवणे याच्याशी वाद झाला या वादातून शुभम ने जय उर्फ साईवर चाकूने उजव्या व डाव्या बाजूस गंभीर वार केले. या हल्ल्यात जय गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभम सोनवणे याला अटक . करण्यात आली आहे.पुढील तपास पी.आय . सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक खेडकर सह पोलीस करीत आहेत. शहरात घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!