भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

या दिवशी जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे १५०० रुपये

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण या योजने अंतर्गत मे महिन्याचे १५०० रुपये लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जातील.

लवकरच जमा होणार मे महिन्याचा हप्ता
लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला असून, तो महिला व बालविकास खात्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळत असून येत्या काही दिवसांत १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील असे सांगितले जात आहे.

असही सांगितलं जातं आहे की, जर महिलांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तर कदाचित मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होतील. परंतु, या आठवड्याच्या शेवटपर्यंत पैसे जमा होण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे.

मे आणि जून चा हप्ता एकत्र मिळणार?
मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले असल्याने, या आठवड्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी मे महिन्याच्या ३० -३१ तारखेपर्यंत १५०० रुपये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

मे महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मे आणि जून महिन्याचे ३००० रुपये महिलांच्या खात्यात एकत्र येतील, असं बोललं जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पुढच्या महिन्यात वटपोर्णिमेचा मूहूर्त साधून महिलांना पैसे दिले जाऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!