एक दिवसाचे नवजात मृत अर्भक आढळले, यावल तालुक्यातील धक्कादायक प्रकार
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |एक दिवसाचे नवजात मृत अर्भक गावा शेजारील मोकळ्या जागेत टाकून दिल्याची घटना यावल तालुक्यातील चुंचाळे या गावात दिनाक २१ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील विलास भावलाल पाटील हे आपल्या शेतात जात असताना, त्यांच्या घराशेजारी मोकळ्या जागेत कुत्रे जमिनीवर काहीतरी खाण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच कुत्र्यांना हाकलून जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक दिवसाचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले
यावल पोलिसाना या संदर्भात माहिती दिली असता पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्भक ताब्यात घेतले. यावल पोलिस स्टेशनला अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक संबंधातून जन्मलेले हे बाळ असावे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता पोलीस मृत अर्भकाच्या निर्दयी मातेचा शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चा रंगल्या आहेत.

