भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भारत – पाकिस्तान क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा बेटींग, दोघे ताब्यात

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी इंडीया वि. पाकिस्तान क्रिकेट मैचवर ऑनलाईन बंटींग (सट्टा) खेळविणार ०२ इसमांवर कारवाई करुन १,०५,०००/ रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दि.२१/०९/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील पोउपनि शरद बागल व त्यांचे पथकातील अंमलदार यांना गोपनिय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, भुसावळ बाजार पो.स्टे. हहोत ईसम नामे प्रकाश हुंदामल सारडा रा. नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ, हा त्याचे राहते घरी इंडीया वि, पाकिस्तान क्रिकेट मैचवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळवित आहे.

सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना देवुन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पा. स्टाफ पंच यांच सह जावुन छापा कारवाई केली असता इसम नामे १) प्रकाश हुदागल कारडा वय ५५ वर्ष रा. सिंधी कॉलनी, भुसावळ, २) रणजीत चत्रधान हंडी वय 35 वर्ष रा. गणपती नगर, जळगांव हे इंडीया वि, पाकिस्तान क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटींग सट्टा) खेळवितांना त्यात एक लॅपटॉप, तीन मोबाईल, एक कल्यूलेटर, २९ स्लिप छापलेल्या मिळुन आल्याने त्यांचे जवळुन १,०५,०००/- रु किं. च ऑनलाईन बेटींग (सट्टा) च साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच विरुध्द भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. येथे सीसीटीएनएस गुरनं. ४५८/२०२५ महाराष्ट्र जुगार अधि. कलम ४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक जळगांव, डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, श्री अशोक नखाते, उपविभागीय पालोस अधिकारी, भुसावळ उपविभाग, श्री संदीप गावीत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि, शरद बागल, श्र. पोउपनि, रवि नरवाडे, पोहकों उमाकांत पाटील, पोना/विकास सातदिवे, पोको राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, मपोकों/दर्शना पाटील, चा. पोहेको भरत पाटील सर्व स्थागुशा, जळगांव यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!