भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासनमहाराष्ट्रराजकीय

स्वीकृत नगरसेवक पदासाठी अभ्यासू, अनुभवी व्यक्तींना संधी , काय आहेत निकष?निकषानुसार होणार का निवड?

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात आतापर्यंत शेकडो लोकांना तरी स्वीकृत नगरसेवकपदाचे गाजर दाखविण्यात आले आहे

एकाच जागेसाठी दोन प्रबळ दावेदार पक्षात असतील तर त्यापैकी एकाला संधी देताना दुसऱ्याला स्वीकृत नगरसेवकपद देऊ, असे सांगून शांत केले गेले. तरीही बंडखोरी केलीच तर उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावताना स्वीकृत नगरसेवकपदाचे गाजर (गुल्फी) दाखविले गेले. त्यामुळे निकाल लागण्याआधीच जिल्हाभरात शेकडो स्वीकृत नगरसेवक तयार झाले आहेत.

स्वीकृत पदासाठी असा उमेदवार हवा की त्याच्या अनुभवाचा, शिक्षणाचा मोलाचा सल्ला नगरपालिकेला मिळू शकतो. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या ज्ञानाचा उपयोग शहर विकासासाठी होण्यासाठी स्वीकृत नगरसेवक घेण्याची तरतूद नगरपालिका अधिनियमात आहे. परंतु पुढाऱ्यांचे, नेत्यांचे नातेवाईक ,जवळचे कार्यकर्ते, जी हुजुरी करणारे, किंवा पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतले असे कार्यकर्ते यांचीच वर्णी लागते. तर अधिनियमातील तरतुदींना फाटा देत हरताळ फसला जातो. या संदर्भात नगरविकास विभागाकडून अधिनियमाच्या तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

स्वीकृत नगरसेवकासाठीचे निकष
डॉक्टर, निवृत्त प्राचार्य, वकील, इंजिनिअर, निवृत्त अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी

मान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव

शिक्षणतज्ज्ञ म्हणून पाच वर्षांचा अनुभव.

निवृत्त प्राध्यापक, प्राचार्य

सनदी लेखापाल म्हणून पाच वर्षांचा अनुभव

अनुभवी इंजिनिअर

अभिवक्ता किंवा राज्यात विधी क्षेत्राचा अनुभवी व्यक्ती

मुख्याधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त पदावरून सेवानिवृत्त

नोंदणीकृत समाजाधिष्ठित संस्थेत ५ वर्षे पदाधिकारी कामाचा अनुभव”

अनेक ठिकाणी ज्यांची समाजात किंमत नाही, परंतु पुढाऱ्यांची / वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची जी हुजुरी करत चमकोगिरी करणारे सुद्धा स्वीकृत पदाच्या शर्यतीत असल्याचे दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!