मंत्रिमंडळ विस्तारात “याना” संधी? ” या” माजी मंत्र्यांना नारळ? शिंदे गटाच्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात महायुतीचं नवीन सरकार स्थापन झालं. आता प्रतीक्षा मंत्रिमंडळ विस्ताराची, मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे.मंत्रिपदासाठी जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे. यात मोठ्या प्रमाणावर अनुभवी आमदार आहेत. अनेक आमदारांनी नंबर लागावा म्हणून लॉबिंग सुरू केली आहे.मंत्रीपद देण्यासाठी नेत्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. शिंदे गटाने माजी मंत्र्यांच्या कामगिरीचे अहवाल तयार केले आहेत, एका खाजगी एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. या रिपोर्ट कार्ड नुसार यात काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर या मध्ये काही माजी मंत्री नापास झाले आहेत.
या दोन माजी मंत्र्यांना डच्चू?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी आणि संभाव्य मंत्र्यांचं तसंच इच्छुक आमदारांचं प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार केले आहे. यात दोन माजी मंत्री नापास ठरले आहेत. माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे या रिपोर्ट कार्ड मध्ये नापास झाले आहेत. मराठवाड्यातून असलेले अब्दुल सत्तार आणि विदर्भातून असलेले संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंत्री मंडळात मंत्री पदासाठी मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून मंत्रिपदाच्या इच्छुकांची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये कोणाला संधी देणार, कोणाचा पत्ता कट करणार? हा पेच कसा सोडविणार की एकनाथ शिंदे नापास झालेल्यांना पास करणार की त्या जागी नवीन चेहेऱ्यांना मंत्री पदाची संधी देणार ? याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
५७ आमदारांचं बळ असलेल्या शिंदे शिवसेनेला १० ते १२ मंत्रिपदं दिली जाणार असून मंत्री पदी कोणाची वर्णी लावावी या साठी मोठी कसरत करावी लागणार असून रिपोर्ट कार्ड नुसार वर्णी लावणार की रिपोर्ट कार्ड बाजूला ठेवले जाणार? हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.
शिंदे शिवसेनेच्या रिपोर्ट कार्ड मध्ये पास झालेले संभाव्य मंत्री.
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादा भुसे
४) शंभूराजे देसाई
५) तानाजी सावंत
६) दीपक केसरकर
७) भरतशेठ गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जुन खोतकर
११) विजय शिवतारे