पाचोरा

अज्ञात वाहनाची पॅजो रिक्षाला धडक, दोघे जागीच ठार

Monday To Monday NewsNetwork।

पाचोरा(प्रतिनिधी)। पाचोरा- भडगाव रोडवरील रस्त्यावर एका पॅजो रिक्षाला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या अपघातात शेंदुर्णीचे दोघे जागीच ठार झाले असून अज्ञात वाहनधारक फरार झाला आहे.

पाचोरा – भडगाव रस्त्यावर बांबरुडमहादेवाचे गावा नजिक अंतुर्ली फाट्याच्या पुढे शेंदुर्णी येथील पॅजो रिक्षाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन अज्ञात वाहनधारक फरार झाला या अपघातात पॅजो रिक्षाचा चालक व प्रवासी असे दोघे जागीच ठार झाले ,पॅजो रिक्षामध्ये किराणा सामान भरलेला होता.यात एका मयताचे नाव भालचंद्र नरसिंह परदेशी रा. शेंदुर्णी असे त्याच्या खिशातील आधारकार्ड वरुन ओळख झाली. या अपघातात घटनास्थळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व कॉग्रेस पदाधिकारी यांनी मदत केली तसेच पोलीस उपनिरीक्षक चौबे सह त्याचे सहकारी पोलीस यांनी ही मदत करून पंचनामा केला. अपघात शेंदुर्णी येथील दोघ जागीच ठार झाल्याने शेंदुर्णी वर दुःखा ची छाया पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!