भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरशैक्षणिक

अंतुर्ली येथे आरटी(RTE)धारक पालकांची शाळा प्रशासनाकडून होतेयं मोठी लूट, शाळेच्या मनमानी कारभाराची चौकशीची मागणी

मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | सौ,कुसुमताई तुकाराम महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल अंतुर्ली ता,मुक्ताईनगर जि,जळगाव, युडयस क्र,(27031100106)येथे आरटीई (RTE) नियमांचे उल्लंघन करून शाळेकडून( RTE)धारक पालकांपासून शाळेचा गणवेश,पुस्तके ,व सीबीएसई (CBSE )पॅटर्न मध्ये कन्व्हर्ट करा,असे करणे दाखवून बेकायदेशीरपणे फी आकारून मोठी आर्थिक लूट केली जात आहे,इत्यादी गंभिर अनियमितीची चौकशी करावी,,,

आम्ही खाली सही करणारे पालक असून आपचे पाल्यचे (RTE)२५% मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सौ, कुसुमताई तुकाराम महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल, अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, युडयस क्र,(27031100106), येथे इयत्ता,१ते४ मध्ये शिकत आहे.सदर शाळा ही खाजगीमान्यताप्राप्त शाळा असून, आरटीई (RTE)अधिनियम २००९महाराष्ट्र शासनाचा प्रचलित नियमानुसार आरटीई(RTE) अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची प्रवेश फी,शिक्षण फी,गणवेश फी पाठ्यपुस्तके किंवा शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली रक्कम आकारणे कायद्याने निषिद्ध आहे, असे आदेश मा,शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दि, 24मार्च 2026 रोजी विधानसभेत दिले आहे आणि जर का अशा प्रकारे आरटीई च्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी आकारत असल्यास संबधित शाळांवर कठोर कारवाईच स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही, शाळा आमच्याकडुन शाळेचा गणवेश, पुस्तके व तुमचे प्रवेश सीबीएसई(CBSE )मधे कन्व्हर्ट करू असे सांगुन फी/पैसे आकारत आहे, आणि या शाळेजवळ कोणत्याही प्रकारची सीबीएसई (CBSE) पॅटर्न चालवण्याची कायदेशीर परवानगी नाही, किंवा मान्यता सुद्धा नाही, तरीही काही पालकांकडून (CBSE)चां नावाखाली पैसे वसूल करून पालकाची आर्थिक लूट करत आहे.

सदरून आमचे प्रवेश अर्ज Rte कडून स्टेट बोर्ड मध्ये निवड झालेली असून पुढील state board च्या विद्यार्थ्यांचा पुढील भविष्य काय असेल असाही प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झालेला आहे. एवढेच नव्हे ,सर्व पांलकाना शाळेचे गणवेश विशिष्ट विक्रेत्यांकडून खरेदी करण्यास सक्ती केली जात आहे,तर गावाबाहेरील विक्रेत्याला बोलवून त्यांना शाळेचा गणवेशाचा चार्ट देवून त्यांच्या मार्फत गणवेश विक्री करण्यात येत असून पालकांना कोणताच पर्याय न देता त्याच विक्रेत्यांकडून गणवेश खरेदी करण्यास भाग पाडत जात आहे, यामधे शाळा प्रसानाचे आर्थिक हितसंबंध अथवा कमिशन व्यवहार असल्याचा पालकांना संशय निर्माण होत आहे या संपूर्ण व्यवहाराची आर्थिक चौकशी करण्यात यावी,

तसेच आम्ही RTE धारक पालक असुन या अगोदर आमच्याकडुन कोणतीच फी आकारली जात नव्हती, परंतु आता का?या सर्व साहित्याची फी आकारत असताना आम्ही पावती मागितली तरी पावती सुध्धा देण्यास त्यांनी नकार दिला, असे आम्ही शाळा प्रसानाला विचारणा केली असता, ते म्हणाले आम्हाला शासनाकडून आरटीई (RTE)ची कोणतीच रक्कम येत नाही, असे सांगत आहे, व बरेच असे उडवा उडविचे उत्तर देत आहे ,विशेष म्हणजे मां, शिक्षणमंत्री यांनी विधानसभेत असे कृत्य करणाऱ्या शाळेवर कठोर कारवाई चे आदेश दिले असतानाही ते पूर्णपणे उलंघन करत आहे,शाळेची ही कृती बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा (RTE Act 2009) आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या पूर्णपणे विरोधात बेकादेशीर आहे,वरील सर्व बाबींच्या विचार करता सबंधित शाळा व्यवस्थापनाने आरटीई RTE अधिनियम २००९ महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियम व शिक्षण विभागाच्या निर्देशनाचे उल्लंघन केले असल्याचे प्रथम दर्शनी परिस्थिती दिसून येत आहे , त्यामुळे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप होणे आवश्यक आहे,आणि या फी आकारणीमुळे आमच्या मुलाच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे.

तरी. आपण त्वरित या शाळेच्या मनमानी कारभाराची चौकशी करावी शाळा आकारत असलेल्या फी वर बंधन आणावे, आणि आरटीई (RTE) विद्यार्थ्यांना शासनाने दिलेला हक्क मिळून द्यावा,..अशी मागणी (RTE)धारक पालकांनी मा, गटशिक्षण अधिकारी मुक्ताईनगर,प्राथमिक व माध्यमिक जिल्हा शिक्षण अधिकारी,जिल्हा अधिकारी,जळगाव,यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे, संबंधित अधिकारी (RTE )च्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेकडून त्यांचा हक्क मिळवून देता का? याकडे पालकाचे लक्ष लागले आहे,

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!