भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव जिल्ह्यातील शाळेचा मुख्याध्यापक एसीबी च्या जाळ्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मेडिकल बिल बिलाचा प्रस्ताव सादर करून ते मंजूर करून आणून देण्याचे मोबदल्यात एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्री संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालयातील संदिप प्रभाकर महाजन, वय ४५ वर्ष. या मुख्याध्यापकास ३ हजार ६०० रुपयांच्या लाच मागणी प्रकरणात जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

तक्रारदार हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्री संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालय या शाळेत शिपाई असून संदिप प्रभाकर महाजन,
हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे २३८१५/-रुपयाचे मेडिकल मंजूर होणे कामी मुख्याध्यापक संदीप महाजन यांच्याकडे सादर केले होते. सदर मेडिकल बिल स्वतःचे वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याचे मोबदल्यात संदीप महाजन यांनी तक्रारदार यांच्याकडे ५०००/- रुपये लाचेची मागणी केली बाबत तक्रारदार यांनी दिनांक २१/१२/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची पडताळणी केली असता मुख्याध्यापक संदीप महाजन यांनी तक्रारदार यांच्या पत्नीचे २३८१५/- रुपयांचे मेडिकल बिल मंजूर करून आणून देण्याचे मोबदल्यात तडजोडी अंती सदर मेडिकल बिलाच्या एकूण रकमेच्या १५ % प्रमाणे ३६००/-रुपयांची लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम मागितली होती.

या संदर्भात संदिप प्रभाकर महाजन, वय ४५ वर्ष. मुख्याध्यापक श्री. संत हरिहर माध्यमिक हायस्कूल नेपाणे ता. एरंडोल जि.जळगांव वर्ग ३. यांचे विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

दरम्यान, या पूर्वी मुख्याध्यापक संदिप महाजन यांनी या अगोदर वर नमुद गुन्ह्यातील तक्रारदार शिपाई यांचेकडून वेतन निश्चिती च्या फरकाचे २,५३,७८०/- रु. फरकाचे ५ टक्के प्रमाणे १२,५००/- रू. ची मागणी करून तक्रारदार याचेकडून १०,०००/- रु. लाच रक्कम स्विकारली होती . म्हणून मुख्याध्यापक संदिप महाजन यांचे विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन गुरं न१०५/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ प्रमाणे दि.२७/०६/ २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची कारवाई सापळा व तपास अधिकारी योगेश ठाकूर
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. सफौ सुरेश पाटील चालक पोहेकॉ किशोर महाजन. पो.ना. बाळू मराठे. पोकॉ प्रदीप पोळ यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!