शासकीय कामात अडथळा निर्माण करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास धक्काबुक्की
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाचे अभियंता यावल तालुक्यातील वड्री या गावात शेत गट क्रमांक ८९ जवळ हडकाई नदीच्या पुलाचे काम सुरू होते. तेथे गेले असता त्यांना शासकीय कामात अडथळा आणून त्यांच्याशी चार जणांनी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केली.
यावल तालुक्यातील वड्री या गावाच्या शेत शिवारात शेत गट क्रमांक ८९ जवळ हडकाई नदी आहे. येथे पुलाचे काम झाले आहे. व उर्वरित काम या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान त्या कामा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यावल येथील सहाय्यक अभियंता केतन अशोक मोरे हे गेले होते. तेव्हा तेथे त्यांच्यासोबत संजय रशीद तडवी, शकील रशीद तडवी, रशीद रमजान तडवी यांचे नातू आणि रशीद रमजान तडवी यांची पत्नी या चार जणांनी वाद घातला. त्यांना शिवीगाळ केली.
शासकीय कामात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी केतन मोरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला संजय रशीद तडवी, शकील रशीद तडवी, रशीद रमजान तडवी व रशीद रमजान तडवी या चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.