कुतूब हजरत पिर मंजन शाह बाबा यांचा संदल शरीफ कार्यक्रम संपन्न
सावदा, ता . रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | येथील स्वामींनारायण नगर रोड जवळील स्टेट बँक समोर असलेल्या कुतूब हजरत पिर मंजन शाह सरकार यांच्या संदल शरीफ मिरवणूक शनिवारी दि.७ जुन रोजी संपन्न झाली.
दरवर्षा प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी ६ वाजता फेटे बांधण्याचा कार्यक्रम चांदणी चोक मध्ये आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी प्रमाणे होत असलेल्या कार्यक्रमास हिंदू मुस्लिम बंधू भगिनींनी कुतूब हजरत पिरमंजन शाह बाबा च्या दर्शनाचा लाभ घेतला.
शनिवारी रोजी रात्री ९ वाजता दर्गा ठिकाणी भुसावळ येथील युसुफ अंदाज चिसती सावदा येथील शकील नक्षबंदी कव्वाली चा शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या धार्मिक कार्यक्रमास सर्व हिंदू मुस्लिम भाविकांची उपस्थित होती. कार्यक्रमात सावदा येथील API विशाल पाटील, हेड कॉन्स्टेबल देवरे दादा गोपींनिय चे मयूर पाटील राकेश झोपे सं.अजगर, कुशल जावळे , संदल आयोजक मा नगरसेवक शेरखां तडवी दर्गा येथील मुजावर महेमुद पिंजारी, पिरखा तडवी, रमजान तडवी , सलीम तडवी, मुराद तडवी , नवाज तडवी जावेद तडवी, आमीन तडवी, समीर तडवी, सरकार शे मुक्ततार शे फिरोज वली पिंजारी गोस खान शफी पिंजारी रोउफ पिंजारी उपस्थित होते.