भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमचोपडाजळगाव

बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड, १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव.मंडे टू मंडे न्यूज ||जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अवैध स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करून तिची बाटलीबंद पॅकिंग करणाऱ्या ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत बनावट देशी दारूच्या सीलबंद बाटल्या, बनावट लेबल, बुचे, रिकाम्या बाटल्या, सीलिंग मशीनसह तब्बल १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२५ ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला चोपडा तालुक्यात अवैधरीत्या बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाई दरम्यान तेथे बनावट मद्य तयार करून त्याची बाटलीबंद पॅकिंग केली जात असल्याचे आढळून आले.तसेच त्या सोबत
छाप्यात बनावट देशी दारूच्या सीलबंद बाटल्या, बनावट लेबल, बुचे, मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या, पाणी ओढण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार, पाण्याच्या टाक्या, स्वयंचलित सीलिंग मशीन तसेच बाटलीबंदीसाठी आवश्यक अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्यांवर महाराष्ट्रात विक्रीसाठी असल्याचे दर्शविणारी लेबले लावण्यात आल्याचेही तपासात समोर आले. त्यामुळे बनावट मद्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून ते बाजारात विक्रीसाठी पाठविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ज्ञात-अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बनावट दारू निर्मितीमागील सूत्रधार तसेच या व्यवसायात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली. आर. व्ही. चव्हाण, दुय्यम निरीक्षक, भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कारवाईबाबत माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!