जुगार अड्ड्यावर छापा, १६ जुगारी ताब्यात, मध्यरात्री एलसीबी ची कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मालकासह १६ जुगारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ७ लाख २२ हजारांची रोकड व ५ लाख रुपयांचे मोबाईल असा एकूण १२ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून १६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील शाम कॉलनी मध्ये घडली.
पाळधी ( तालुका धरणगाव) येथील शाम कॉलनीतील एका घरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीवरून घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्डूयावर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी १६ जुगारींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ७ लाख २२ हजार २६० रुपयांची रोख रक्कम व ५ लाख २ हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु होती.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अक्रम शेख, प्रवीण भालेराव,नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, विनोद पाटील, विजय पाटील, रविंद्र चौधरी, रविंद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर,, रतन गिते, मयुर निकम, भारत पाटील, राहुल रगडे, सलीम तडवी, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.


