राजेश्री पाटील यांची शिक्षणतज्ञ म्हणून शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड….
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील शिरसाड (ता.यावल) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पुढील 2 वर्षाच्या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. यामध्ये शिक्षणतज्ञ सदस्य म्हणून शिरसाड येथील कै. सौ.कमलाबाई एकनाथराव पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या संचालिका सौ.राजेश्री तेजस पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. राजेश्री पाटील या यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे मा.उपसभापती तथा संचालक तेजस धनंजय पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत.
यासोबत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र खंबायत, उपाध्यक्ष पदी सायली सचिन शिरोळे, सदस्यपदी मीनाबाई युनूस तडवी, कविता हिरालाल धनगर, ज्योती कैलास ठाकूर, आरती कांतिलाल कोळी, सुजाता लिलाधर धनगर, मनिषा प्रकाश धनगर, भीमराव इंगळे, हबीब सिकंदर तडवी, पन्नालाल भालेराव, शिक्षक प्रतिनिधी म्हणून संदीप बारी सर, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पूर्वेश भास्कर कोळी, तबसूम सिकंदर तडवी यांची एकमताने निवड झाली. नवनियुक्त समितीचे सर्व गावकऱ्यांनी, पालकांनी अभिनंदन केले.
