भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

सावदा येथे रेशनवर अळंब लागलेली खराब ज्वारी वाटप प्रकरण : चौकशी साठी पुरवठा पथक दाखल

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सावदा येथे स्वस्त धान्य दुकानावर गहू व तांदूळ सह ज्वारी लाभधारकांना वाटप करण्यात आली. पुरवठा विभागाकडून आलेल्या गहू, तांदूळ व ज्वारी या धान्यांपैकी मात्र वाटप करण्यात आलेली ज्वारी ही अत्यंत निकृष्ट, अळंब लागलेली व उग्र वास येत असलेली ज्वारी वाटप करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात माजी नगरसेवक भानुदास भारंबे यांनी भ्रमणद्वनी द्वारे प्रांताधिकारी बबन काकडे यांच्या कडे तक्रार केली होती. व “मंडे टु मंडे न्युज” ने या संदर्भात वृत्त दिले होते.

संबंधित बातमी– सावदा रेशन दुकानावर निकृष्ट दर्जाची अळंब लागलेली ज्वारी वाटप, माजी नगरसेवक भानुदास भारंबेची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

या बाबत अधिक माहिती अशी की, सावदा येथील रेशन दुकानावर पुरवठा विभागाकडून इतर धान्यासोबत ज्वारी ही पुरवठा करण्यात आली.. मात्र त्या पैकी ज्वारी ही खराब , निकृष्ट दर्जाची व उग्र वास येत असलेली ज्वारी पाठविण्यात आली. सदरची अशीच ज्वारी रेशन दुकानदारांना ग्राहकांना वाटप करावी लागली. या संदर्भात माजी नगरसेवक भानुदास भारंबे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे भ्रमणद्वनी द्वारे तक्रार करण्यात आली होती.

माजी नगसेवक भानुदास भारंबे यांच्या तक्रारीवरून सदर वृत्ताची दखल घेत जिल्हास्तरहून चौकशी करण्यात आली. दिनाक ३१ जानेवारी रोजी रावेर तालुका पुरवठा अधिकारी सरोदे मॅडम, गोडाऊन कीपर हर्षल पाटील यांच्यासह पथक सावदा येथे रमाबाई महिला बचत गट स्वस्त धान्य दुकान क्रमांक १४ येथे दाखल झाले.

या संदर्भात चौकशी करून खराब ज्वारी प्रकरणी अहवाल तयार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक भानुदास भारंबे यांच्यासह काही लाभधारकांना बोलाविण्यात आले. त्या वेळी वाटप करण्यात आलेली खराब ज्वारी बदलून नवीन चांगली ज्वारी देण्याचे सांगितले. त्या प्रमाणे लाभधारकांनी खराब व निकृष्ट ज्वारी रेशन दुकानावर जमा करावी. त्यांना नवीन चांगली ज्वारी देण्यात येणार आहे.या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांच्याशी सुद्धा माजी नगरसेवक भानुदास भारंबे यांनी  या प्रकरणी फोनवरून चर्चा करण्यात आली. या पुढे खराब धान्य दिले जाणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

गोडाऊन मधूनच पाठविण्यात आलेली ज्वारी वाटप करण्यात आली असून ती खराब ज्वारी रेशन दुकानावर जमा करून त्या बदल्यात त्यांना पुरवठा विभागाकडून नवीन ज्वारी पाठविण्यात येणार आहे. त्या नुसार लाभधारकांनी खराब ज्वारी रेशन दुकानावर जमा करून चांगली ज्वारी त्यांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!