बंद घरातून ५० हजार चोरून : नूतन पोलिस निरीक्षकांचे चोरट्यांनी केले स्वागत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील शिक्षक कॉलनी मधिल बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरा मधील कपाटातील ५० हजार रुपयांची चोरी करत काही दिवसांपूर्वी नव्याने रुजू झालेले रावेर पोलिस निरिक्षक कैलास नागरेचे चोरट्यांनी स्वागत केले आहे. रावेर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी, दि .३ – ९ -२१ ते ११ – ९ -२१ च्या दरम्यान शिक्षक कॉलोनी मध्ये रहिवाशी असलेल्या नयना फत्तू तडवी हे बाहेर गावी गेल्या असल्याने त्यांचे घर बंद होते. घराला कुलूप असल्याचे फायदा घेऊन अज्ञात चोरटयाने बंद घराचे कुलूप तोडत घरात प्रवेश करत घरामधील कपाटातील ५० हजार रुपयांची चोरी केली. याबाबत नयना फत्तू तडवी यांनी रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या वरुन ४५४/४५७/३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांचा मार्गदरशनाखाली पी एस आय सोनवणे तपास करीत आहेत.