ऐनपुर निंबोल रस्ता पाण्याखाली शेतकऱ्याची पिके पाण्यात : लाखोचे नुकसान
ऐनपुर ता. रावेर, मंडे टू मंडे प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊस सुरू असून मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात तापी नदीच्या उगम स्थानावर पाऊस चालू असून आज रोजी तापी नदीला पूर आला आहे त्या बॅकवॉटर चा फुगोट्याचे पाणी ऐनपुर निंबोल रस्त्यावर आले असून रस्ता संध्याकाळी ७ वाजेपासून रस्त्यावर पाणी असल्यामुळे रहदारी बंद झाली होती शेतकऱ्याची शेती पाण्याखाली गेली होती तसेच भाजीपाला पेरूची मळे पाण्याखाली आली आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
- यावल तालुक्यात अमोल जावळे याना उस्फुर्त प्रतिसाद, सर्वसामान्यांकडून महायुती सरकारच्या निर्णयांचे कौतुक
- US Election 2024 Live Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
- ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
तापी नदीच्या फुगोटाचे पाणी ऐनपुर निंबोल रस्त्यावर ४ वाजेपासून पाणी वाढण्यास सुरुवात झाली होती ह्या भागात असलेली शेती संपूर्ण पाण्याखाली आली असून त्यात केळी पेरू भाजीपाला ची शेती पूर्ण पाण्याखाली आली आहे तसेच ऐनपुर निंबोल रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्ता बंद झाला होता तसेच येथील गावातील किनारपट्टीवर असलेल्या लोकांचे स्थलांतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले आहे यावेळी सरपंच अमोल महाजन ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर पृथ्वीराज जैतकर यांनी नदी काठावरील लोकांना स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती