मुक्ताईनगरराजकीय

रावेर लोकसभा महायुती,भाजपा उमेदवार खा.रक्षाताई खडसे यांचा नांदुरा तालुक्यात प्रचाराचा झंझावात

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर लोकसभा “महायुती व भाजपा” उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नांदुरा तालुक्यातील मौजे तांदुलवाडी, शेंबा, टाकरखेड, बेलुरा खैरा, महाळुंगी, माळेगांव गोंड ई. गावात प्रचार केला.या वेळी परिसरातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सार्वत्रिक निवडणुक २०२४” मध्ये “रावेर लोकसभा” क्षेत्र “भाजपा व महायुती” च्या लोकप्रिय उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी माजी आमदार श्री.चैनसुख संचेती व नांदुरा तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई.मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह नांदुरा तालुक्यातील मौजे तांदुलवाडी, शेंबा, टाकरखेड, बेलुरा खैरा, महाळुंगी, माळेगांव गोंड ई. गावात प्रचारार्थ मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन, मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीतजास्त संख्येने भाजपा ला मतदान करण्याचे आवाहन केले. या वेळी मतदारांनी उस्फुर्थ् प्रतिसाद मिळाला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!