क्राईमरावेर

सावदा – खिरोदा रस्त्या दरम्यानच्या परिसरात तील ढाब्यांवर देशी – विदेशी दारूची सर्रास विक्री

सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा खिरोदा रस्त्यादरम्यानच्या परिसरात तील ढाब्यांवर व हॉटेलीवर देशी – विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर सर्रास विक्री सुरू असून तरुणांमध्ये दारू पिण्याच्या व्यसानांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.राज्य उत्पादन शुल्क या कडे माहिती असून सुद्धा मुद्दामहून दुर्लक्ष्य करीत असल्याची परिसरातील ग्रामस्थांची ओरड आहे .तसेच हा परिसर सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत असून या कडे दुर्लक्ष्य केले जात असल्याचे बोलले जाते.

या भागातील ढाब्यांवरील व हॉटेलीवर अवैध दारू विक्रीवर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे अर्थपूर्ण संबंधातून जाणूनबुजून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. हे ढाबे चालवणारे विक्रीसाठी कुठून दारूच्या बाटल्या आणतात, हे शोधणे महत्वाचे आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!