खिर्डी,धामोडी,रोझोद्यासह रावेर तालुक्यात वादळाच्या तडाख्याने लाखोंचे नुकसान
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। तालुक्यातील खिर्डी गावासह परिसरात तसेच रावेर तालुक्यातील धामोडी परिसर,रेम्भोटा परिसर, रोझोदा परिसर अशा तालुकाभरातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उन्हाच्या तीव्र उकाड्यानंतर मान्सून पूर्व आलेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र.शेतकऱ्यांची चिंता वाढविली असून वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झालेले दिसत आहे.तसेच तालुकाभरातील हजारो हेक्टर जमिनीवरील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.तसेच अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले असून वृक्ष उन्मळून पडल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदरील नुकसानीचा आढावा घेऊन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.