पशुवैद्यकीय दवाखान्यातील सेवांवरील सेवाशुल्कात सुधारणा
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। पशुसंवर्धन विभागांतर्गत सर्व प्रकारच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत शेतकरी/ पशुपालक यांचेकडील रुग्ण पशु-पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी सेवाशुल्काचे दर निश्चित करण्यात आलेले असून त्यास बराच कालावधी लोटलेला आहे. रुग्ण पशुंवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औषधी, शल्यचिकित्सेसाठी आवश्यक हत्यारे, उपकरणे, अवजारे इ. च्या किंमतीत मागील काही वर्षात वाढ झालेली आहे.
पशुसंवर्धन विभागांतर्गत रुग्ण पशु-पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी सध्या आकारण्यात येत असलेल्या विविध सेवांसाठीच्या सेवाशुल्काच्या दरात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. वर नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेवून पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येत असलेल्या विविध सेवांच्या सेवाशुल्कासंदर्भात खालील शासन निर्णयातील वाचा अनुक्रमांक १, २ व ३ येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांच्या सेवाशुल्कात सुधारणा –
(1) राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत शेतकरी/पशुपालक यांच्याकडील रूग्ण पशु-पक्ष्यांना विविध पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी आकारावयाच्या सेवाशुल्कांच्या सुधारीत दरांचा तपशिल पुढीलप्रमाणे असून, सदरचे दर हे प्रति पशु, पक्षी, तपासणी, चाचणीसाठीचे आहेत.
अ.क्र. बाब सुधारित दर (रूपये)
1) पशुस्वास्थ्य विषयक सेवा केस पेपर शुल्क निशुल्क
उपचार १०/-
खच्चीकरण (वळू, रेडा, वराह, बोकड व नर मेंढा) १०/-
2) रोग प्रतिबंधक लसीकरण
जनावरे (लहान तसेच मोठी) १/-
कुक्कुट पक्षी १/-
3) शस्त्रक्रिया
लहान शस्त्रक्रिया
कुत्री व मांजर १००/-
मोठी जनावरे (खच्चीकरण वगळून) ५०/-
वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर २०/-
मोठ्या शत्रक्रीया
कुत्री व मांजर १५०/-
मोठी जनावरे ७०/-
वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर ५०/-
4) कृत्रिम रेतन व अनुषंगिक सेवा
कृत्रिम रेतन (दवाखान्यात) ५०/-
कृत्रिम रेतन (शेतकऱ्यांच्या दारात) ५०/-
5) गर्भधारणा तपासणी (कृत्रिम रेतना व्यतिरिक्त) १०/-
6) गायी/म्हशींतील वंध्यत्व तपासणी १०/-
7) रोग नमुने तपासणी
डी.एल.सी. १०/-
आरबीसी काऊंट १०/-
डब्ल्यूबीसी काऊंट १०/-
रक्त काचपट्टी १०/-
शेण नमुने १०/-
मुत्र नमुने १०/-
स्क्रॅपिंग्ज १०/-
इतर (वरील चाचण्या व्यतिरिक्त) १०/-
8) रक्त व रक्तजल तपासणी
ग्लुकोज २०/-
फॉस्फरस २०/-
क्रियेटीनीन २०/-
कॅल्शियम २०/-
रक्तातील हिमोग्लोबीन २०/-
9) उती नमुने तपासणी १०/-
10) पाणी, खाद्य, व्हिसेरा नमुन्याची विषबाधा तपासणी १००/-
11) दुध नमुने तपासणी १००/-
12) क्ष – किरण तपासणी
लहान जनावरे (कुत्री, मांजर, वासरे, शेळी, मेंढी, वराह व इतर) १००/-
मोठी जनावरे १००/-
13) सोनोग्राफी
लहान जनावरांच्या प्रत्येक तपासणीकरिता (कुत्रे, शेळी, मेंढी, वआरबीसी काऊंट राह व इतर लहान पशु) १००/-
सर्व मोठ्या जनावरांच्या प्रत्येक तपासणीकरिता १००/-
14) आरोग्य दाखले
मोठी जनावरे ५०/-
लहान जनावरे २०/-
15) महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९७६ (सुधारणा १९९५) अंतर्गत अनुसूचित पशुची कत्तलपुर्व तपासणी २००/-
16) शवविच्छेदन (न्याय वैद्यक प्रकरण वगळून) १००/-
गायी-म्हशींमधील दवाखान्यात तसेच शेतकऱ्यांच्या दारात केलेली कृत्रिम रेतने यासाठीच्या सेवाशुल्काची रक्कम प्रचलित पध्दतीनुसार महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर या संस्थेकडे भरणा करण्यात यावी. उपरोक्त प्रमाणे सुधारित सेवाशुल्काचे दर दि.२१.०६.२०२२ पासून अंमलात येतील.