भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेरचे तत्कालिन पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांची चौकशी

Monday To Monday NewsNetwork।

रावेर (प्रतिनिधी)।राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर करणे आदी कारणामुळे जिल्हाभरात गाजलेले रावेर पुरवठा विभागाचे तत्कालीन पुरवठा निरिक्षक हर्षल पाटील यांच्या चौकशीला येत्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.

अनेक आरोपासह ,शासकीय अर्जात परस्पर बदल करणे,अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड ३ रुपये प्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे असा प्रकरचा ठपका तत्कालीन पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तात्कालीन पुरवठा निरिक्षकांची बदली करून कर्तव्यात कसूर कोणी केला ? याची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात फैजपुर प्रांतधिकारी कैलास कडलक याची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाची येत्या आठवड्यापासुन चौकशीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चर्चिले जाणारे या प्रकरणाकडे बघितले जाते चौकशी तुन काय बाहेर येते,की क्लीनचिट दिली जाते या कडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!