सावदा नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची मागणी, प्रशासक काळात नगरपालिका वाऱ्यावर !
सावदा, ता.रावेर.मंडे टू मंडे न्युज नेटवर्क| सावदा नगरपालिका मध्ये प्रभारी मुख्याधिकारी असल्याने पूर्ण वेळ देवू शकत नाही, सावदा नगरपालिकेत अनेक कामे प्रलंबित असून दोन – दोन वर्षांपासून असे अनेक तक्रारी व अर्ज पडून आहेत की त्यांचेवर कुठलीही कारवाई केलेली नाही, नगर पालिकेचे आर्थिक नुकसानही होत असल्याची जिवंत उदाहरणे आहेत. नागरिकांची कामे होत नसल्याच्या अनेक तक्रारी असून चालढकल केली जात आहे.
सध्या सावदा नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार रावेर नगर परिषद च्या मुख्याधिकारी स्वलीहा मालगावे यांच्याकडे असून त्या सावदा पालिकेला कधी केव्हा येतात हे कुणालाही माहिती नसते, किंवा या बद्दल कुठलीही माहिती मिळत नसल्याने नागरिकांचे अडचणीचे निवारण होत नाही.
पालिकेत बांधकाम अभियंता, नगररचना विभाग अभियंता, स्वच्छता निरीक्षक, संगणक अभियंता, अग्निशमन अधिकारी हे अधिकारी पूर्ण वेळ नाहीत, त्यामुळे त्या रिक्त असलेल्या पदाचा तात्पुरता पदभार दुसऱ्या अधिकारी कर्मचारी यांना दिलेला आहे ,त्यामुळे ज्यांना तो पदभार दिला गेला आहे त्यांना त्यांच्या मूळ विभागातील तसेच मूळ नगरपालिकेचा कार्यभार सांभाळून कामकाज करावे लागत आहे. काही कर्मचाऱ्याना दोन – तीन विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
लेखापाल यांच्याकडे भुसावळ नगरपालिकेचा , लेखापरीक्षक यांच्याकडे रावेर नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार आहे ,तसेच कार्यालय अधीक्षक यांच्याकडे स्वच्छ्ता निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार आहे. या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त पदभार दिल्याने अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे काही महत्वाची आवश्यक कामे आल्यास आवश्यक ते अधिकारी उपलब्ध होऊ शकत नसल्याने अडचणी निर्माण होतात.
त्यातल्यात्यात सावदा नगरपालिका कार्यालयातील अत्यावश्यक सेवेतील काही अधिकाऱ्यांची निवडणुका कामी आदेश करण्यात आलेले आहेत. तसेच बांधकाम अभियंता विभागाचां पदभार फैजपूर नगरपालिकेच्या अभियंत्यांकडे अतिरिक्त पदभार दिलेला आहे.अनेक कामे वेळेवर होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पालिकेतील रिक्त पदे कधी भरले जातील हे अनिच्चीत असले तरी सावदा नगरपालिकेला कायमस्वरूपी पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी सावदा शहवासीयांकडून केली जात आहे.