शिंगाडी येथील पुनर्वसन ग्रस्तांचे प्रांताधिकऱ्यांना निवेदन, आदोलनचा इशारा
ऐनपूर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील मौजे शिंगाडी येथील जमिनीचे मुल्यांकन अहवाल देण्यास दिरंगाई करुन पुर्नवसन करणे साठी वेळ काढु पणामुळे पुनर्वसन ग्रस्त लोकशाही मार्गाने आंदोलन करणे बाबत मौजे शिंगाडी ता.रावेर येथील संपुर्ण पुनर्वसन ग्रस्त लाभार्थी यांच्या कडुन प्रांताधिकऱ्यांना निवेदन देण्यात आले.
अधिक माहिती अशी की, मौजे शिंगाडी येथील पुनर्वसन . भु . स क ६८/२००७) असून सदर जमिनिचे मुल्यांकन करीत फैजपुर प्रांत अधिकारी यांना तीन वेळा स्मरण पत्र दिलेली आहे परंतु त्यानी जमिनीचे मुल्यांकन केलेली नसल्यामुळे अवार्ड करणे अडचणीचे झालेले आहे सदर आम्ही पुनर्वसन ग्रस्त अनेक वेळा या विषया बाबत विभागातिल अधिकाऱ्याच्या भेटीघेऊन विनंती केल्या पंरतु त्यानी नेहमी दुर्लक्ष केलेले आहे सदर २२२/१ ग . न . क्षेत्र हे पुनर्वसनासाठी समाविस्ट असतांनासुद्धा या क्षेत्रात अनधिकृतपणे प्लाट पाडुन सदर शेतकरी हे शासनची व पुनर्वसन ग्रस्ताची दिशाभुल करीत आहेत.
त्यामुळे आमच्यावरती अन्याय होत आहे तरी मोहदय सदर विभागने शेतीवर अनिधीकृत केलेली नोंदी रद करून मुल्यांकन अहवाल त्वरीत दयावा अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही सर्व पुनर्वसन ग्रस्त दिनांक (३०/ मे/२०२२) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर आमरण उपोषण करणार आहोत याची नोंद घ्यावी असे निवेदन प्रांत अधिकारी याना देण्यात आले निवेदन देताना सरपंच राजु सवर्णे, उमेश गाढे व पुनर्वसन ग्रस्त नागरीक उपस्थित होते.