भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

खिर्डी येथे आरोग्य उपकेंद्रात जागतिक क्षयरोग दिन साजरा…

खिर्डी,ता.रावेर मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या खिर्डी खु/बु येथील आरोग्य उपकेंद्रात २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. व जागतिक क्षयरोग दिनाबाबत माहिती देवून कॉम्पुटरद्वारे लाईव्ह प्रक्षेपण करून जनजागृती करण्यात आली.

तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रतीक पाटील.व सचिन पाटील यांनी ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य कर्मचारी चंदन पाटील,अजय सोळंके, एस आर शिरणामे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!