दुचाकीच्या समोरासमोर धडक : एक जण ठार !
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : रावेर-पाल दरम्यान दोन दुचाकीच्या समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील पाल रस्त्यावर मध्यप्रदेशात रावेरहून पालमार्गे दुचाकी जात होती यादरम्यान पालकडून रावेरच्या दिशेने समोरून येणारी दुचाकीची गारखेडा घाटात दोन दुचाकीची एकमेकांनावर जोरदार आदळल्याने झालेल्या या गंभीर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
सदरील या घटनेतील मयताचे नाव अद्याप कळू शकते नसून रावेर पोलीसांकडून सदरील घटनेला दुजोरा दिला आहे.