Video : रावेर पोलीस निरीक्षका कडून वर्दी व पदाचा दुरुपयोग : रावेर पोलीस स्टेशनमध्ये ६ तरुणांना बेदम मारहाण ! तक्रार
रावेर, प्रतिनिधी : येथील रावेर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी शुल्लक कारणावरून एक तर्फी दाखल तक्रार मागे घेण्याकरिता तक्रारदार गटावर दबाव तंत्राचा वापर करून ६ पैकी २ तरुणांवर प्रतिबंधक कारवाई केली. व त्यानंतर सर्वांना काड्या पट्ट्याने जबर मारहाण केली असता त्यातील एका तरुणास एवढी मारहाण केली की त्याचे २ पाय देखील फॅक्चर झाल्याची धक्कादायक घटना रावेर पोलीस स्टेशनात घडली असून याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक जळगांव यांच्याकडे अब्दुल रहेमान शेख करीम यांच्याकडून तक्रारी करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, रावेर येथे दि.२/११/२०२२ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अक्रम व अमजद या दोघा तरुणांमध्ये मोटर सायकलच्या वरून किरकोळ भांडण झालेल्याने हे पोलीस ठाण्यात आले असता पोलीस निरीक्षक यांनी सदरील दोन्ही तरुणांना समज न देता त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. व ४ युवकांना त्यांचे हात पिवळे झाले तोपर्यंत बेदम मारहाण केली. यादरम्यान बाबर शेख अब्दुल रहमान या तरुणास कारण नसताना एवढ्या प्रमाणात मारहाण केली परिणामी त्याचे दोन्ही पाय फेक्चर झाले असून त्या तरुणाला उपचारासाठी जळगांव येथे तारा हॉस्पिटलात दाखल केलेले आहे. तसेच या सर्व तरुणांना आतंकवादी म्हणत अश्लील शिवीगाळ देखील केला. सदरील अधिकारी रावेर येथे रुजू झाल्या पासून मोठ्या प्रमाणात दहशत माजवलेली आहे. त्यांच्या मनमानीपणे वागण्यामुळे तसेच कोणत्याही कामात आर्थिक देवाण-घेवाण शिवाय काही करीतच नाही यामुळे देखील येथील नागरिक त्रस्त झालेले असून तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन न्याय मिळावा असे जिल्हा पोलीस अधीक्षक जळगांव यांच्याकडे अब्दुल रहेमान शेख करीम रा. रावेर दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटलेले आहे. तसेच न्याय न मिळाल्यास मानव अधिकार आयोगाकडे देखील दाद मागितली जाईल असे देखील त्यांनी म्हटले आहे.
तसेच पोलिसांच्या जबर व अमाणूसपणे मारहाणीत दोन्ही पाय फॅक्चर झालेल्या बाबरशेख या तरुणास रावेर येथील अंबिका व्यायाम शाळेच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जळगांव येथे नेण्यात आले. सदरील शुल्लक घटने मध्ये एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य न बजावता व सद्रक्षणाय व खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यला विसरून सदरील पोलीस निरीक्षक यांनी वर्दी व आपले पदाचा गैर उपयोग करणे ही खेदाची बाब असून कठोर कारवाईस पात्र नाही का? तसेच तरुणांना जबर व अमानूश मारहाण करतेवेळी त्यांची संवेदनशीलता लुप्त होण्यामागचे कारण काय? याकडे वरिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी तक्रारदार यांच्याकडून करण्यात आली आहे.