भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्रीडारावेर

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेरच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा दिनांक 3 ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे झालेल्या 73वी पुरुष 36 वी महिला वरिष्ठ गट, 74 वि पुरुष व 37 वी महिला कनिष्ठ गट, 18 वी मुले/मुली युथ गटात राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाली, या स्पर्धेत जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या खेळाडूंनी विक्रमी कामगिरी करत 13 सुवर्ण,7 रोप्य,4 कास्य पदकांची लयलूट केली. तसेच युथ ज्युनिअर व सिनियर या गटांची जनरल चॅम्पियनशिप पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपले वर्चस्व अबाधित ठेवले. जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचा खेळाडू उदय महाजन व किरण मराठे यांना स्पर्धेतील बेस्ट लिफ्टर अवार्ड ने सन्मानित केले. राज्यस्तरीय स्पर्धेत सलग 14 वेळा जेते/उपविजेते पद पटकावून जळगाव जिल्हा संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात वेटलिफ्टिंग क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे

विजयी खेळाडूंची नावे युथ गट : _१) ४९ किलो गट_ तुषार रविंद्र महाजन सुवर्ण पदक
२) ५५ किलो गट उज्वल राजेंद्र महाजन सुवर्ण पदक
३) ६७ किलो गट प्रणित निलेश महाजन स्वर्ण पदक
४) ७३ किलो मयूर दिलीप बारी सुवर्णपदक
५) ७३ किलो गट प्रथमेश कैलास चौधरी रौप्यपदक
५) ८१ किलो गट दिनेश विनोद महाजन सुवर्णपदक
६) ८१ किलो गट आकाश राजेश शिंदे कास्य पदक
७) ८९ किलो गट निखील गणेश महाजन रौप्य पदक
८) १०२ किलो गट नेत्रांजन नीलकंठ पाटील सुवर्णपदक (युथ/ज्युनिअर) *ज्युनिअर सिनियर गट*

९) ५५ किलो गट उदय अनिल महाजन सुवर्णपदक (बेस्ट लिफ्टर अवार्ड)
१०) ६१ किलो गट गोविंदा सुनील महाजन कास्य पदक
११) ६७ किलो गट अभिषेक गणेश महाजन सुवर्ण/रौप्य पदक
१२) ७३ किलो गट रवींद्र मराठे डबल सुवर्णपदक ( बेस्ट लिफ्टर अवार्ड )
१३) ८१ किलो दुर्गेश सुनील महाजन सुवर्ण/कास्य पदक
१४) ८९ किलो तेजस रमेश रणसिंगे कास्य/कास्य पदक
१५) ८९ किलो गट पंकज राजेश महाजन रौप्यपदक
१६) ९६ किलो गट मनीष कैलास महाजन रौप्यपदक
१७) १०९ किलो गट विष्णू कैलास भोई सुवर्णपदक
विजयी खेळाडूंचे जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष श्री प्रकाश मुजुमदार, संजय मिसर, प्रदीप मीसर, राजेश शिंदे, प्रमोद महाजन, प्रकाश बेलकर, यशवंत महाजन यांनी अभिनंदन केले. क्रीडाशिक्षक अजय महाजन, युवराज माळी, संदीप महाजन, नितीन महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
फैजपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे मुख्य प्रशिक्षक श्री योगेश महाजन सर यांनी सांगितले की, विजय खेळाडूंपैकी बरेचसे खेळाडू हे यापूर्वी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू आहेत व ओरिसा भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देखील पदक मिळतील असा विश्वास व्यक्त करून. फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सिद्धेश्वर अखेगावकर हे करीत असलेल्या विशेष सहकार्याबद्दल आभार मानले व भविष्यात रावेर चे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळतीलच अशी खात्री असल्याचे सांगितले रावेर शहर प्रतिनीधी

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!