किंनगाव जवळ पपई वाहून नेणारा ट्रक उलटल्याने १६ मजुरांचा जागीच मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (प्रतिनिधी): अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात यावल तालुक्यातील किनगाव येथे मध्यरात्रीनंतर घडला.
धुळे जिल्ह्यातून पपई घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाला. रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने हा ट्रक उलटला. यातील १६ मजूर जागीच मृ्त्यूमुखी पडले. या ट्रकमध्ये एकूण २१ मजूर असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. मृत व जखमी मजुरांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आज रात्री 12 वाजता पपई ची गाडी कीनगाव जवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात पलटी होऊन भीषण अपघात झाला.यात आभोडा येथील 12, केर्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर ठार झाले असून 5 गंभीर जखमी झाले आहेत.सर्व 16 मृतदेह ग्रामीण रुग्णालय यावल येथे आहेत.
मयताची नावे ,शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार वय 30 रा फकीर वाडा रावेर, सरफराज कासम तडवी वय 32 रा के-हाळा, नरेद्र वामन वाघ वय 25 रा आभोडा, डिंगबर माधव सपकाळे वय 55 रा रावेर, दिलदार हुसेन तडवी वय 20 आभोडा, संदीप युवराज भालेराव वय 25 रा विवरा, अशोक जगन वाघ वय 40रा आभोडा दुर्गाबाई संदीप भालेराव वय 20 रा आभोडा, गणेश रमेश मोरे वय 05 वर्ष रा आभोडा-,
शारदा रमेश मोरे वय 15 वर्ष रा आभोडा, सागर अशोक वाघ वय 03 वर्ष रा आभोडा, संगीता अशोक वाघ वय 35रा आभोडा. सुमनबाई शालीक इंगळे वय 45 रा आभोडा कमलाबाई रमेश मोरे वय 45 रा आभोडा, सबनुर हुसेन तडवी वय 53 रा आभोडा सर्व मजूर हे रावेर तालुक्यातील अभोडा ,केऱ्हाळे व रावेर येथील रहिवासी असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.