भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बोदवळ

शिरसाळा मारोतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची रिक्षा पलटली, तरुणाचा मृत्यू

बोदवड , मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शिरसाळा मारोती च्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची ॲपे रिक्षा बोदवड शहरामध्ये जामनेर रोड परिसरातील अरिहंत जिनिंग समोर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबातील काही जण जखमी झाले आहेत.

जामनेर तालुक्यातील योगेश ज्ञानदेव मंगळकर (वय २८, रा. नवेदाभाडी, ता. जामनेर) हे ॲपे रिक्षाने आपल्या परिवार व नातेवाईकांसह शिरसाळा मारुती येथे दर्शनासाठी जात असताना जामनेर रोडवरिल अरिहंत जिनिंगसमोर ही ॲपे रिक्षा (एमएच १९ बियु ४६०७) पलटी झाल्याने योगेश ज्ञानेश्वर मंगळकर गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. तर त्यांचे नातेवाईक व परिवारातील उषाबाई ज्ञानदेव मंगळकर ( वय- ५० वर्ष,रा. नवेदाभाडी, ता. जामनेर), रामदास राजाराम गोरे (वय-९०, रा. जामठी, ता. बोदवड), धर्मेश गोरख बच्छाव (वय-३२,रा. संगमनेर), दिवाकर भास्कर नेवाड (वय-२१,नवेदाभाडी, ता. जामनेर), उज्ज्वला युवराज राऊत (वय-३५,रा.बऱ्हाणपूर) यांच्यावर बोदवड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची बोदवड पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!