भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर तालुक्यातील इसमाचा सुकी नदीत पाण्यात बुडून मृत्यू

रावेर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील पाल येथील सुकी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या बिलराम भिलाला या ४६ वर्षीय इसमाचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची घटना २० जून शुक्रवार रोजी उघळकीस आली. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रावेर तालुक्यातील पाल येथील बिलराम केकड्या भिलाला (वय ४६, रा. पाल) हे नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी मासेमारी साठी सुकी नदी वर गेले होते. मात्र संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना शोध घेत असताना सुकी नदी काठी त्यांचे कपडे, बूट, मासे मारीचे जाळे आणि साहित्य आढळून आल्याने त्यांच्या सोबत काही अनर्थ घडल्याची शक्यता लक्षात घेत त्यांनी रात्रभर शोध घेतला. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह नदीत तरंगताना त्यांना आढळून आला.

घटनेची पोलिसाना माहिती कळविण्यात आली. पाल पोलीस चौकीचे पोलीस कॉ. जगदीश पाटील, आमीन तडवी यांनी घटनास्थळी मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

बिलराम भिलाला हे कुटुंबातील एकटेच कमावते व्यक्ती होते.
मासेमारी आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनं कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!