ऐनपुर येथील सरदार पटेल विद्यालयात योग दिवस साजरा..
ऐनपुर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. विजय के अवसरमल | सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, ऐनपूर येथे २१ जून जागतिक योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक पी आर महाजन यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. योग व प्राणायाम यांचा मानवाच्या जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मोलाचा वाटा आहे.विद्यार्थ्यांना योग व प्राणायाम याबद्दल के.डी.पाटील मॅडम यांनी माहिती दिली.
क्रीडा शिक्षक श्रीकांत महाजन, वाय वाय तडवी सर व दोन खेळाडूंनी प्राणायाम व योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यालयातील १००० चे वर विद्यार्थ्यांनी व शिक्षक, शिक्षिका यांनी सहभाग नोंदवला.खेळाडुंनी योगासने व मनोरे यांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.मुख्याध्यापक पी आर महाजन,उप मुख्याध्यापक जी आर महाजन, पर्यवेक्षिका आर आर इंगळे यांनी आयोजन केले.सूत्रसंचलन के.डी.पाटील मॅडम यांनी केले.सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
