अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या भागात घरफोडी, पोलिसांचा धाक संपला की काय ?
सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा येथील सावदा – फैजपूर रोडवरील पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर सावदा – बसस्थानकांच्या मागील बाजूस असलेल्या सोमेश्वर नगर मधील प्लॉट नं.५७७/९ मधील रहिवाशी धनराज रंगू पाटील हे आपल्या नातेवाईकांकडे बाहेरगावी पुणे येथे गेले असल्यांचा फायदा घेत दि ३० एप्रिल मंगळवार च्या मोठ्या पहाटे च्या वेळी त्यांच्या घराचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करुन चोरी केली.
प्रथम दर्शनी चोरट्यांनी घरातील स्वयंपाक खोलीतील पीठ, डाळीचे डबे, घरातील कपाटातील कपडे, देवघरातील मुर्ती अस्ताव्यस्त केलेले दिसून आले. पाणी ओढण्याची मोटार सुद्धा चोरून नेली आहे. घरमालक धनराज पाटील हे त्याच्या पत्नीसोबत बाहेरगावी असल्याने याबाबत त्यांच्याशी आजूबाजूच्या लोकांनी संपर्क साधून चोरी संदर्भाची माहिती देऊन तसेच त्यानी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असता पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत, घरातील अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाचा पंचनामा केला, घरातुन पैसा – अडका – दागिने असा काही ऐवज चोरीला गेला का, किंवा किती रक्कमेची चोरी झाली याबाबत घरमालक आल्यानंतरच नक्की काय काय चोरीला गेले आहे या बाबत आकडा समजु शकेल. घरातील अस्ताव्यस्त सामान पाहून चोरटयानी कुठलाही धाक न बाळगता शांत डोक्यांने चोरी केल्याचे दिसून येत आहे. ही चोरी घर बंद पाहून रेकी करूनच केली असावी असा अंदाज केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी सोमेश्वर नगरांतीलच बंद घरातुन अशाच प्रकारे चोरी झालेली आहे, परंतु पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंद करण्यात आलेली नाही. शहराच्या बाहेर ही नवीन वस्ती असल्याने येथे नागरिकांची फारशी वर्दळ नसते. चोरीच्या घटनामुळे नागरीक कमालीचे धास्तावले असून या चोरीचा छळा लवकरात लवकर लावावा याबाबत नागरीकांनी मागणी केलेली आहे.
पोलिस अधिकारी राहत असलेल्या भागात घरफोडी, चोरांना पोलीसाचा धाक राहिला नाही काय?
विशेष म्हणजे सोमेश्वर नगर येथे चोरी झालेल्या घराच्या पूर्वेकडील बाजूस उप-विभागीय पोलीस अधिकारी फैजपूर भाग फैजपूर (भारतीय पोलीस सेवा) आय.पी.एस अन्नपूर्णा सिंह यांचे निवासस्थान तर पश्चिमेकडील बाजूस सहाय्यक पोलीस निरीक्षक (ए.पी आय) यांचे निवासस्थान असून देखील चोरट्यांनी घरफोडी करून घरांतुन चोरी केलेली आहे, यावरुन चोरटयांना पोलीसाचा धाकच राहिला नाही की काय?याबाबत परिसरांत मोठी चर्चा होतांना दिसत आहे.
नगरपालिका प्रशासनाचे नविन नागरी वस्तीकडे दुर्लक्ष, पथदिव्यांची व्यवस्था नाही.
नगरपालिका दार वर्षी कर संकलन करते, त्यात दिवाबत्ती कराचीही वसुली केली जाते, परंतु इतके वर्ष झाले कर वसूल करीत असताना सुद्धा अद्याप पर्यंतब्या भागात पुरेशी पथदिव्यांची व्यवस्था केलेली नाही, या परिसरात पथदिव्यांअभावी रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते,चोरट्यांनी हीच संधी साधून आणि त्या मुळेच चोरटयानी संधीचा फायदा घेत घरफोडी केल्याचे बोलले जाते. सदर परिसरत ही नवीन वाढीव वस्ती असून या ठिकाणी या आधी शेती होती ,व आजही ह्या वस्तीच्या शेजारीच शेतीचा परिसर असल्याने विंचू, साप, हिस्त्र श्वापदे यामुळे नागरिकांच्या जिवीतांस धोका सुद्धा निर्माण होण्याचा संभव असताना सुध्दा नगरपालिका प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.