रावेर

कार – बाईक अपघातात चिनावल येथील दोघांचा जागीच मृत्यू !

सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा- खिरोदा रस्त्यावर चिनावल येथील बाईक स्वार व होंडा कंपनीची कार यांचा अपघात होऊन मोटार सायकल वरील दोघे जागीच ठार झाले. ही घटना आज दिनांक ३० एप्रिल मंगळवार रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान सावदा कोचूर दरम्यान कोचूर येथील स्मशान भूमी जवळ घडली.

या अपघातात चिनावल येथील वीरेंद्र सुनील नेमाडे वय २७ वर्ष, व अनिल चुडामन मेढे वय ६५ वर्ष यांचा मृत्यू झाला. हिरो होंडा कंपनीची बाईक फॅशन प्लस एम एच १९ ए बी ११०१ व होंडा कंपनीची ग्रे रंगाची बी आर व्ही एम एच १९ डी एम ० ३५१ या गाडीचा जोरदार अपघात झाला असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व त्यांचे सहकारी यांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करीता पाठवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!