मुक्ताईनगर तालुक्यातील सरपंचासह शिपाई जळगाव एसीबी च्या जाळ्यात
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुळ तक्रारदार हे काकोड़ा गावातील रहिवासी असून ते परिवारासह गावात राहतात, तकारदार यांना काकोड़ा गावात ग्रामपंचायतीची बखळ जागा स्वतःचे नावे करुन त्यावर शासनाचे घरकुल योजने अंतर्गत घर बांधायचे असल्याने त्यासाठी तकारदार सरपंच श्री तुळशीराम रामा कांबळे यांना भेटले, तेव्हा सरपंच कांबळे यांनी तकारदारांना दि.३०.१०.२०२४ रोजी ग्रामसेवक काकोडा यांच्या सहीचा नमुना नंबर ८ चा उतारा आणून दिला. सदरचा उतारा काढून आणून दिला त्याच्या मोबदल्यात तकारदार यांच्याकडे सरपंच कांबळे यांनी ५०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. सदरबाबत तक्रारदार यांनी दि.०७.११.२०२४ रोजी सरपंच श्री कांबळे यांचे विरूध्द ला.प्र.वि. जळगाव यांचे कडे लाच मागणी बाबत तकार दिली होती.
तक्रारीनुसार दिलेल्या तक्रारीची पडताळणी कली असता सरपंच कांबळे यांनी तक्रारदार यांच्या नावे काकोडा ग्रामसेवक यांच्या सहीचा नमुना क.८ बा उतारा तयार करुन आणून दिला त्या मोबदल्यात ग्रामपंचायत शिपाई आत्माराम मेहनकार यांनी पंच साक्षीदार यांचे समक्ष ३,०००/- रुपये लाचेची मागणी केली, सदर लाच मागणीस सरपंच कांबळे यांनी प्रात्साहन दिल्याची खात्री झाली. म्हणून दिनाक ९ डिसेंबर २०२५ रोजी तुळशिराम रामा कांबळे, सरपंच ग्रामपंचायत काकोडा, ता. मुक्ताईनगर जि. जळगांव. व आत्माराम मेनकर, ग्रामपंचायत शिपाई ग्रामपंचायत काकोडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव यांचे विरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी- योगेश ठाकुर, पोलीस उप अधिक्षक, ला.प्र.वि. जळगांव. सापळा अधिकारी
श्रीमती स्मिता नवघर, पालीस निरीक्षक, ला.प्र.वि., जळगांव
स. फौज दिनेशसिंग पाटील, पोकों/अमोल सुर्यवंशी नेमला.प्र. वि जळगांव. तपास अधिकारी हेमंत नागर, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि . जळगाव यांनी केली

