भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

राज्यावर “कोल्ड वेव्ह” चं संकट, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | हवामान विभागाने राज्यात थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवली आहे. दिनाक ९,१०, आणि ११ डिसेंबर रोजी राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमान अगदी ७ अंश सेल्सिअसपर्यंत निम्न स्तरावर पोहोचू शकते.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक आणि अहिल्यानगर या संपूर्ण पाचही जिल्ह्यांत कमालीचा गारठा जाणवणार आहे. नाशिकमध्ये ७ तर जळगावमध्ये पारा ६ अंश सेल्सिअसवर येण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात देखील गारठ्यात कमालीची वाढ झाली असून १० डिसेंबर रोजी मुंबईत मुख्यतः निरभ्र आकाश राहील आणि किमान तापमान १५ अंश सेल्सिअस इतके असेल. कोकणात देखील हीच परिस्थिती असेल.

तर पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात गारठा तीव्रतेने वाढणार आहे. पुण्यात तर किमान तापमान ८ अंश सेल्सिअस एवढी नीचांकी नोंदवले जाईल. तर यापुढील दोन दिवस तापमान केवळ ७ अंश सेल्सिअस राहील. पुणे आणि सोलापूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  तर नागपूरमध्ये किमान तापमान ९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी असेल.

मराठवाड्यात १० डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड आणि परभणीला कोल्ड वेव्हचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ११ डिसेंबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला असल्याने प्रशासनाने वृद्ध आणि लहान मुलांची व स्वतः नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, विदर्भात सातत्याने आता थंडी झपाट्याने वाढताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी थंडीच्या लाटेचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ८,९,१०,११  डिसेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा जारी केला आहे. तीव्र थंडी पडेल. विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशातील काही ठिकाणी थंडीची लाट आहे.

उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक आहे. पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीच्या मोठ्या लाटेचा इशारा देण्यात आला. याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!