भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

१९९४ सालचा दाखला,… आणि,.. सावदा पालिकेच्या विशेषसभेत रंजना भारंबे यांची पीठासीन अधिकारीपदी निवड !

 सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सावदा नगरपरिषदेची सोमवारी समन्वयक समित्या आदी विषयांवरील विशेष सभा पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती या सभेत नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष हे दोन्ही प्रकृती अस्वस्थता कारणाने अनुपस्थित असल्याने एन वेळी सभा बरखास्तीचा विषय उपस्थित झाल्याने आल्याने राष्ट्रवादीचे गटनेते राजेश वानखेडे यांच्या राजकीय अनुभवाच्या डायरीतून भाजपा-शिवसेना युतीच्या गटनेत्या रंजना ताई भारंबे यांना सर्वानुमते या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून अनुमती देण्यात यावी अशी भूमिका मांडली यानंतर प्रभारी नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून गटनेत्या रंजना ताई भारंबे यांनी सभेचे कामकाज पाहिले.

संबंधित व्हिडिओ – इतिहासाचा दाखला,… आणि,.. सावदा पालिकेत १९९४ ची पुनर्रावृती घडली… गटनेत्या रंजना भारंबे पीठासीन अधिकारी झाल्या !

सावदा पालिकेची वाचनालय समिती, वृक्ष संवर्धन समिती, शाळा समन्वयक समिती आदी विषयांवरील विशेष सभा दि 9 सोमवार रोजी पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती यावेळी सभेच्या सुरवातीसच अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुपस्थित असल्याने सभा स्थगित करण्याचा विषय समोर आल्यावर गटनेत्या रंजना भारंबे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सहकारी नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे गटनेते राजेश वानखेडे यांच्याशी चर्चा केली. आता सभागृहात सदस्य उपस्थित झाल्यावर असे करणे योग्य नाही असे मत मांडत राष्ट्रवादिचे गटनेते राजेश वानखेडे यांनी आपला राजकीय अनुभवाचा डायरीतून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थिती नगरपरिषदेच्या इतिहासातील 1994 सालाचा दाखला देत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या गैहजेरीत त्यावेळी हाजी हबीब बुल्ला पठान यांना त्यावेळी पीठासीन अधिकारी बनविण्यात येऊन सभेचे कामकाज केले गेले होते.

याचप्रमाणे आज देखील आपण गटनेत्या रंजना ताई भारंबे यांना प्रभारी तथा पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा विषय सुचविले त्या नंतर नगरसेवक शाम अकोले यांनी देखील चर्चेत भाग घेत हाच विषय पुढे नेला व या नंतर राजेश वानखेडे, शाम अकोले यांनी सुचविलेल्या नावाला नगरसेविका जयश्री नेहेते यांनी अनुबोदन दिले सर्व समितीने गटनेत्या रंजना ताई भारंबे यांना प्रभारी नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी यांनी घोषणा केली. त्याचवेळी नगरसेवक शाम अकोले यांनी त्यांना अध्यक्षीय आसना पर्यन्त नेऊन विराजमान केले

प्रभारी नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी रंजना ताई भारंबे यांनी दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सभागृहात श्रद्धांजली शोक सभेचा प्रस्ताव मांडला तथा दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर राष्ट्रवादी गटा तर्फे सर्व नगरसेवक यांनी पीठासीन अधिकारी रंजना भारंबे यांना एक निवेदन सादर करून सदर सभागृहात स्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली तर यानंतर स्व अजितदादा यांना श्रद्धांजली म्हणून सभेचे कोणतेही विषय पटलावर न घेता ते पुढील सभेत घेण्यात येतील असे पीठासीन अधिकारी रंजना भारंबे यांनी सांगत सदर सभा वंदे मातरम नंतर बरखास्त केली सभेस भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी गटाचे नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!