सावदा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. १ ‘अ’ मध्ये ममता रशीद तडवी यांची प्रचारात आघाडी
सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून सावदा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ ‘अ’ मधून ममता रशीद तडवी या अनुसूचित जमाती मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या अधिकृत उमेदवार असून आघाडी घेतली आहे. “घड्याळ” चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या ममता तडवी या माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत असून यांचे मार्गदर्शन व पाठबळ त्यांना लाभत आहे.
स्वामीनारायण नगर, स्टेट बँक कॉलनी, हाउसिंग सोसायटी, प्लॉटिंग परिसर, रामेश्वर कॉलनी आदी भागांत तडवी यांनी घरोघरी टप्प्या टप्प्याने भेटी देऊन मतदारांशी थेट संवाद साधला. महिलांचा मोठा पाठिंबा त्यांना लाभत आहे.जथा सोबत होता.
प्रचारादरम्यान ममता तडवी म्हणाल्या, “सावदा शहर स्वच्छ, सुंदर आणि सुसंस्कृत व्हावे हीच आमची खरी गुरुकिल्ली आहे. प्रभावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, दिवाबत्ती, कचरा व्यवस्थापन यासह सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी अंडरग्राउंड सांडपाणी निचरा योजना (Underground Drainage Project) व आधुनिक गटार योजनेची अंमलबजावणी मी प्राधान्याने करणार आहे. यासाठी निधी व तांत्रिक बाबींची पूर्ण तयारी आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, ” रस्त्यावर साचलेले सांडपाणी, डासांचा उपद्रव, दुर्गंधी यामुळे नागरिक हैराण आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पूर्ण ताकद लावणार असून, माझ्या विजयानंतर लगेचच या योजनेचे भूमिपूजन करू.”असे सांगितले. प्रभागातील महिलांनी विशेषतः पाणी व स्वच्छतेच्या मुद्द्यावर तडवी यांना पाठिंबा जाहीर केला असून नागरिकांनी “यावेळेस घड्याळ उमेदवारालाच मत देऊ” अशी ग्वाही दिली.
“ममता तडवी सुशिक्षित व आपले हक्काचे उमेदवार असून या प्रभागातील पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या उमेदवार असल्या तरी त्यांचा स्वच्छ चारित्र्य, मेहनती स्वभाव आणि विकासाची जिद्द पाहता प्रभागात घड्याळाची मोठी आघाडी आहे. प्रभाग १ ‘अ’ मध्ये राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे.”दरम्यान, ममता तडवी यांनी प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपला विजय आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे.
