भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा पालिके तर्फे गणपती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुडांची निर्मिती.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

सावदा,मंडे टू मंडे वृत्तसेवा। आपल्या भक्तांकडे गणरायांचं आगमन झालं साधे पणाने त्यानंतर आज गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. ना गुलालांची उधळण, ना ढोलताशाचा दणदणाट पण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ! अशा घोषणा देतच विघ्नहर्ता गणरायाला निरोप दिला जाईल.

शहरातील ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट झालेली दिसून आली. नद्या, बंधारे तलाव यात दरवर्षी मोठ्या प्रमाणत गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते तसेच सर्व निर्माल्य टाकले जाते. यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते व याचा फटका जलचर प्राण्याना सुद्धा होतो. सार्वजनिक गणेश तसेच घरगुती गणेश विसर्जना साठी शासनाने नेमुन दिलेल्या निर्बंधामुळे व विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरीता नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान महाराष्ट्र शासन व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अन्तर्गत सावदा नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्टेशन रोड, सावदा या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुडांची निर्मिती / सोय करण्यात आली आहे.
तसेच ज्या नागरीकांना सदर ठिकाणी विसर्जनासाठी जाणे शक्य होणार नाही अशा नागरीकांकरीता सावदा नगरपरिषदने मोठा आड, इंदिरा गांधी चौक, गांधी चौक येथे श्री गणेशमुर्ती व निर्माल्य संकलन केंद्र सुरू करण्याचे नियोजन केंलेले आहे. नगरपरिषदे मार्फत संकलन केलेल्या गणेशमुर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात येईल.

तरी नागरीकांनी कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता विसर्जन ठिकानी गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या गणेश विसर्जन कुंड तसेच गणेश संकलन केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके, सर्व कर्मचारी वर्ग तसेच सावदा पोलीस स्टेशन चे ए.पी.आय. देविदास इंगोले, समाधान गायकवाड यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!